gharelu kamgar yojana maharashtra :– नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक अतिशय आनंददायी अशी बातमी आता समोर येत आहे ज्यामध्ये राज्यातील सर्व बांधकाम कामगाराना राज्य शासनातर्फे संसार उपयोगी समान ज्यामध्ये भांडी संच व बांधकामासाठी उपयोगी असणाऱ्या सर्व साहित्याची एक पेटी दिली जाते. व त्यासोबतच राज्यातील घरेलू कामगारांसाठी देखील एक महत्वाची अशी बातमी आहे ज्यामध्ये त्यांना सुद्धा या योजनेप्रमाणे भांडी संच व ५ हजार रुपयाचे मानधन हे शासनातर्फे देण्यात येणार असल्याची मोठी घोषणा झालेली आहे व
त्यासंदर्भातील एक GR म्हणजेच शासन निर्णय सुद्धा सरकार तर्फे जाहीर करण्यात आला आहे. तर सदरील योजना काय आहे, यासाठी अर्ज कसा करायचा व पात्रता काय आहे याबाबतची संपूर्ण माहीती आपण आजच्या या लेखाद्वारे बघणार आहोत तरी लेख काळजीपूर्वक संपूर्ण वाचा.
घरेलू कामगार योजना २०२४ काय आहे ?
महाराष्ट्र शासनाने दिनांक २२ फेब्रुवारी २०२४ रोजी उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयाप्रमाणे राज्यातील सन २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये महाराष्ट्र घरेलू कामगार मंडळातर्फे जीवित व नोंदणीकृत कामगारांना संसार उपयोगी भांडी संच व मानधन वाटप करण्यास राज्य शासनाने मान्यता देण्यात आली आहे.
📢 हे देखील वाचा : अतिवृष्टी नुकसान भरपाई अनुदान मिळणार, यादी आली २०२४ | ativrushti nuksan bharpai list 2024
घरेलू कामगार योजना २०२४ योजनेअंतर्गत काय लाभ मिळेल ?
महाराष्ट्र शासनाच्या या gharelu kamgar yojana maharashtra योजनेअंतर्गत नोंदणीकृत महिला कामगारांच्या बाळंतपणसाठी ५००० रुपये मानधन देण्यात येते व त्याबरोबर प्रसूती लाभ महिला कामगारांना दोन अपत्यपर्यंत ५००० अनुदान असे १० हजार रुपायपर्यंत मानधन हे देण्यात येते. व त्याच बरोबर भांडी संच सुद्धा मिळतो ज्यामध्ये खालीलप्रमाणे भांडी मिळतात.
अ. क्र. | वस्तु | संख्या |
१ | वाट्या | ४ नग |
२ | ताट | ४ नग |
३ | ग्लास | २ नग |
४ | पातेले | २ नग |
५ | चमचा | २ नग |
६ | जग | १ नग |
७ | मसाला डब्बा | १ नग |
८ | डब्बा झकणासह १४ इंची | १ नग |
९ | डब्बा झकणासह १६ इंची | १ नग |
१० | डब्बा झकणासह १८ इंची | १ नग |
११ | परात | १ नग |
१२ | प्रेशर कुकर | १ नग |
१३ | कढई | १ नग |
१४ | स्टीलची टाकी | १ नग |
घरेलू कामगार योजना २०२४ अर्ज कसा करायचा व पात्रता काय आहे?
तर मित्रांनो, सदरील घरेलू कामगार योजना २०२४ योजनेअंतर्गत नोंदणी करण्यासाठी आपल्याकडे
१. रहिवासी प्रमाणपत्र
२. आधार कार्ड
३. वयाचा पुरावा
४. ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
५. ओळखपत्र
६. बँक पासबूक
७. तीन पासपोर्ट साईज फोटो
हे सर्व कागतपत्रे तुमच्याजवळ उपलब्ध पाहिजे त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या gharelu kamgar yojana maharashtra या वेबसाइट वर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
He kdhi submit hoil