avkali nuksan bharpai | अवकळी पाऊस नुकसान भरपाई चे पैसे पुन्हा मिळणार , या मंत्र्याची मोठी घोषणा

avkali nuksan bharpai :- नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यात नोव्हेंबर व डिसेंबर २०२३ या कालावधीत अवेळी पाऊस, गारपिट व तसेच चक्रीवादळ यामुळे एका मोठ्या संख्येत शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. तसेच या नुकसानीची दखल घेता राज्य शासनाने यापूर्वी ह्या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी मदत/भरपाई म्हणून यापूर्वी एक शासन निर्णय निर्गमित केला होता

ज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला होता परंतु आता पुन्हा एकदा राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी या नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांसाठी उर्वरित निधी वाटपाची घोषणा करण्यात आली आहे आणि सदरील मदत ही लवकरच आपल्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. तर याबाबतची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखाद्वारे जाणून घेणार आहोत तरी हा लेख संपूर्ण व सविस्तर पणे वाचा.avkali nuksan bharpai

📢 हे देखील वाचा : अतिवृष्टी नुकसान भरपाई अनुदान मिळणार, यादी आली २०२४ | ativrushti nuksan bharpai list 2024

शेतकऱ्यांना कोणती मदत मिळणार ?

महाराष्ट्र राज्यातील शेतकरी ज्यांचे डिसेंबर २०२३ व जानेवारी २०२४ मध्ये अवेळी पाऊस, अतिवृष्टी व गारपीट यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या अतोनात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने दिनांक ७ मार्च  २०२४ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार २४ कोटी ६७ लाख ३७ हजार रुपयांचा निधी हा जाहीर केला आहे.

मदत पुनर्वसन व आपत्ति व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी एक घोषणा केली ज्यामध्ये महाराष्ट्र राज्यात डिसेंबर २०२३ व जानेवारी २०२४ मध्ये झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना avkali nuksan bharpai ही मदत आता लवकर त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.

कोणते शेतकरी पात्र ?

डिसेंबर २०२३ व जानेवारी २०२४ या कालावधीमध्ये झालेल्या नुकसानीचे ज्या शेतकऱ्यांनी राज्य शासनाकडे प्रस्ताव दाखल केले होते व नुकसान भरपाईची मागणी केली होती अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येत्या आठ ते दहा दिवसामध्ये राज्य शासनाने मंजूर केलेली अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम राज्य शासनाकडून वितरित करण्यामध्ये येणार असल्याचे मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले आहे.

नवनवीन योजनांची माहिती त्वरित मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसप ग्रुप ला लगेच जॉइन करा.
Sharing Is Caring:

I am a Marathi YouTuber, Website Developer, and Owner/founder of Maha Agro News website. I am from Jalna, Maharashtra.

Leave a Comment