ativrushti nuksan bharpai list 2024 – नमस्कार शेतकरी मित्रांनो, गेल्या वर्षी आपल्या महाराष्ट्र राज्यात खूप मोठ्या प्रमाणात अवेळी पाऊस व गारपिट यामुळे शेतीपिकांचे अतिशय मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.
यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात त्रस्त व हैराण झालेला होता व आता त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकरी बांधवांसाठी अतिशय मोठी खुशखबर घेऊन आलेली आहे व ज्यामध्ये आता या नुकसानीचे लवकरच अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. सदरील ह्या लेखामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे तरी हा लेख संपूर्ण काळजीपूर्वक वाचा.
राज्यात अवेळी पाऊस किंवा गारपिट आणि इतर नैसर्गिक आपत्तिमुळे शेतिपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते व त्या ativrushti nuksan bharpai list 2024 नुकसांनीसाठी राज्य सरकार काही प्रमाणात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई सुद्धा देते.
आता यामध्ये राज्य सरकारने सुधारणा करून नुकसान भरपाईत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
ativrushti nuksan bharpai list 2024
राज्यात नोव्हेंबर २०२३ मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपिट व इतर नैसर्गिक आपत्तिमूळे होणाऱ्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता राज्य आपत्ति प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत देण्यासाठी महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्यातर्फे दिनांक १ जानेवारी २०२४ रोजी एक शासन निर्णय निर्गमित केला आहे.
📢 हे देखील वाचा : अवकळी पाऊस नुकसान भरपाई चे पैसे पुन्हा मिळणार , या मंत्र्याची मोठी घोषणा
ज्यांतर्गत राज्यात उद्भवणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तिमूळे बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्यासाठी आपत्ति व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम ४८(२) अन्वये राज्य आपत्ति प्रतिसाद निधी (SDRF) ची स्थापना करण्यात आली आहे.
या निधीमध्ये केंद्र शासनाकडून ७५ टक्के व राज्य शासनाकडून २५ टक्के अंशदान दिले जाते. राज्य आपत्ति प्रतिसाद निधीमधून केवळ चक्रीवादळ, दुष्काळ, भूकंप, आग, पुर, तुसनामी, गारपिट, दरड कोसळणे, बर्फखंड कोसळणे(हिमवर्षाव) ढगफूटी टोळघाड, थंडीची लाट व कडक्याची थंडी या १२ नैसर्गिक आपत्तिमूळे बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देणे अनुज्ञेय आहे.
शासन निर्णय –
नोव्हेंबर २०२३ मधील अवेळी पाऊस व गारपिट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपिट व इतर नैसर्गिक आपत्तिमूळे होणाऱ्या शेतीपिकांच्या नुकसणीकरीता बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ति प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत करण्याकरिता खालीलप्रमाणे वाढीव दराने निविष्ठा अनुदान स्वरूपात मदत प्रदान करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.
- जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी मदत – रु.१३६००/- प्रती हेक्टर, ३ हेक्टर च्या मर्यादेत
- बागायत पिकांच्या नुकसानीसाठी मदत – रु. २७०००/- प्रती हेक्टर, ३ हेक्टर च्या मर्यादेत
- बहूवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदत – रु.३६,०००/- प्रती हेक्टर, ३ हेक्टर च्या मर्यादेत
ativrushti nuksan bharpai list 2024 मदत लवकरच शेतकरी बांधवांच्या खत्यावरती जमा होणार आहे.
1 thought on “ativrushti nuksan bharpai list 2024 | अतिवृष्टी नुकसान भरपाई अनुदान मिळणार, यादी आली २०२४”