नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखाद्वारे नवीन घरकुल साठी अर्ज कसा करायचा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. ज्यामध्ये केंद्र शासनातर्फे गरजू नागरिकांना पक्के घर बांधण्यासाठी अनुदान दिले जाते. सदरील प्रक्रिया प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राबवली जाते. सदरील घरकुल योजना 2024 महाराष्ट्र साठी अर्ज सुरू | gharkul yojana 2024 maharashtra योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालिल बेघर/कच्चेघर असलेल्या नागरिकांना पक्के घर बांधण्यासाठी डी.बी.टी. च्या माध्यमातून थेट अर्थसाहाय्य दिले जाते.
तर यासाठी अर्ज करायचा, कागतपत्रे काय लागतील, अर्ज कुठे करायचा याविषयी संपूर्ण माहिती या लेखाद्वारे आपणास मिळणार आहे तरी सदरील लेख संपूर्ण व काळजीपूर्वक वाचा.
घरकुल योजना काय आहे ?
तर मित्रांनो, केंद्र शासनातर्फे राबवण्यात येणाऱ्या घरकुल योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री आवास योजना. ज्या योजनेची सुरवात भारत सरकारने 25 जून 2015 रोजी सुरू करण्यात आली होती. ज्यामध्ये गरीब कुटुंबासाठी पक्के घर बांधणे किंवा ज्या कुटुंबांकडे स्वतः च्या मालकीचे पक्के घर नाही अशा कुटुंबांना घर देणे हा सदरील घरकुल योजना 2024 महाराष्ट्र साठी अर्ज सुरू | gharkul yojana 2024 maharashtra योजनेचा मुख्य हेतु आहे.
सदरील योजनेअंतर्गत मैदानी आणि सपाट भागात घर बांधण्यासाठी 120000 रुपये तर डोंगराळ आणि दुर्गम भागात घर बांधण्यासाठी 130000 रुपये आर्थिक सहाय्य अनुदान स्वरूपात पात्र लाभार्थीयांच्या खात्यावर थेट जमा करण्यात येते.
घरकुल योजनेसाठी पात्रता काय आहे ?
- व्यक्तीचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे.
- सदरील व्यक्ति भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे पक्के घर नसावे.
- अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 300000 ते 600000 पेक्षा जास्त नसावे.
- बीपीएल यादीमध्ये अर्जदार राशनचे कार्ड नमूद करणे आवश्यक आहे.
तर मित्रांनो, वरील मुद्यांमध्ये दिलेली पात्रता आपल्याला घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी अतिशय आवश्यक आहे.
हे देखील वाचा :
घरेलू कामगारांना मिळणार भांडी संच व 5000 रुपये मानधन, असा कर अर्ज
घरकुल योजनेसाठी आवश्यक कागतपत्रे काय आहेत ?
- आधार कार्ड
- जॉब कार्ड
- बँक पासबूक
- पासपोर्ट साईज फोटो
- स्वच्छ भारत मिशन नोंदणी क्रमांक
- मोबाइल नंबर
- उत्पन्न दाखला
तर मित्रहो, वरील पैकी सर्व कागतपत्रे आपल्याला घरकुल योजना 2024 चा अर्ज करण्यासाठी अतिशय आवश्यक आहे. तरी आपण अर्ज करण्यापूर्वी वरील सर्व कागतपत्रे आपल्याजवळ जमा करुन ठेवून मगच सदरील योजनेसाठी अर्ज करावा. घरकुल योजना 2024 महाराष्ट्र साठी अर्ज सुरू | gharkul yojana 2024 maharashtra
घरकुल योजनेसाठी नवीन अर्ज कसा करायचा ?
मित्रांनो सदरील पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना अर्ज 2024 च्या ऑनलाइन वेबसाइट https://pmaymis.gov.in/ वर भेट द्यायची आहे.
- सर्वात प्रथम तुम्हाला लॉगिन करायचे आहे.
- त्यानंतर नागरिक मूल्यांकन अंतर्गत झोपडपट्टीतील रहिवासी किंवा 3 घटकांखालील लाभ वर क्लिक करा.
- त्यानंतर तुमचा आधार क्रमांक टाकून तुमचा आधार तपशील सत्यापित करण्यासाठी तपासा वर क्लिक करा.
- त्यानंतर आपल्यासमोर एक फॉर्म ओपेन होईल. त्यामध्ये आपली माहिती व्यवस्थितपणे भरा.
- त्यानंतर खाली जाऊन सबमीट बटनवर क्लिक करून अर्ज सादर करून घ्या.
अशाप्रकारे तुमच्या घरकुल अर्जाची प्रक्रिया पूर्ण होते. याशिवाय तुम्ही आपल्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जाऊन ऑफलाइन फॉर्म सुद्धा भरू शकता किंवा आपल्या जवळील csc केंद्रावर जाऊन सदरील योजनेविषयी माहिती देऊन त्यांच्याकडून सुद्धा हा फॉर्म भरून घेऊ शकता.
घरकुल साठी नवीन अर्ज करण्यापूर्वी ह्या बाबी लक्षात घ्या..
जेव्हा आपण प्रधानमंत्री आवास योजनेचा फॉर्म ऑनलाइन पद्धतीने भरायला जाता त्यावेळेस खालील माहिती माहीत असणे गरजेचे आहे.
- PMAY ऑनलाइन फॉर्म केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) किंवा कमी उत्पन्न असणारे (LIG) नागरिकच भरू शकतात.
- अर्जदारला चुकीची माहिती किंवा तथ्य दिल्याचे आढळल्यास अर्ज रद्द करून संबंधितावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.
- सर्व pmay कर्ज खाते आधार कार्ड शी लिंक असणे आवश्यक आहे.
- उत्पन्नाच्या पुराव्यामध्ये कोणतेही छेडछाड केल्यास अर्ज रद्द केला जाऊ शकतो.
तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही नवीन घरकुल योजनसाठी घरबसल्या अर्ज करू शकता.gharkul yojana 2024 maharashtra
तर मित्रहो, आपण सदरील लेखाद्वारे घरकुल योजना 2024 महाराष्ट्र साठी अर्ज कसा करायचा याविषयी संपूर्ण व सविस्तर माहिती पहिली. अशाच प्रकारच्या नवनवीन योजनांची माहिती त्वरित मिळवण्यासाठी इथे क्लिक करून आमच्या व्हॉटसप ग्रुप ला जॉइन करा.